शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे,खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. खुद्द पवार यांनी भेट झाल्याची कबूली दिली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मला भेटले, त्यांच्या बोलण्यातून ते भाजपवर नाराज असल्याचं जाणवलं पण आमच्यात भविष्यात एकत्र येण्यासंदर्भात राजकीय चर्चा झाली नाही, राष्ट्रवादी समविचारी पक्षांसोबतच जाणार, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलंय. उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटल्याने राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळताहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यातलं भाजपचं सरकार पाडूही शकतात, शरद पवारांनी मोदी सरकारवर हुकूमशाहीचा आरोपही केला. पवार यांनी यापूर्वीच भाजपाला पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना, भाजपा चा अंतर्गत वादामुळे राज्याचा विकास खुंटला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना, नेत्यांना भाजपा किंमत देत नाही अशी अधून मधून ओरड सुरुच आहे. भाजपामध्ये सर्व काही चांगल आहे असंही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेकेखोरपणाला पक्षातील काही मंत्री पदाधिकारी, कार्यकर्ते कंटाळले आहेत. मुख्यमंत्री कुणाचेही ऐकत नाही. अशा अवस्थेत भाजपाचा कारभार चालला आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांची बाजू मांडत सरकारच्या धोरणाला विरोध केला. मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहेत, सेना सत्तेतून कधीही बाहेर पडू शकते. अशा धमक्या शिवसेनेने वारंवार दिल्यामुळे शिवेसना सत्तेतून कधीही बाहेर पडू शकते. शिवसेनेच्या मुखपत्रातून दररोज भाजपाच्या कामकाजावर टीका होत असते त्यामुळे शिवसेना कोणत्याहीक्षणी सरकारमधून बाहेर पडू शकते. सरकारच्या त्रैवार्षीकपूर्तीला शिवसेनेच्या मुखपत्रातून जमतंय का सांगा असा प्रश्न भाजपाला विचारला होता? शिवसेनेने भाजपाचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादीही बाहेरुन पाठिंबा देणार नाही याचीही चाचपणी करुन घेतली. काही दिवसापूर्वीही नामदार दिपक केसरकर यांनीही आठ दिवस थांबा असे विधान केले होते यामूळे शिवसेनेच्या गोटात सरकामधून बाहेर पडण्याचे निश्चित असून सरकारच काही खर नाय असेच सध्याच्या परिस्थितीवरुन वाटतयं.