बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजलाय. सुष्मिताने तिचे व्यायामाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. त्यात ती तिचे अॅप्स दाखवतेय. या फोटोवरून सुष्मिताला अक्षरश: लग्नासाठी मागणी यायला लागली आहे. सुष्मिताचं वय जरी ४२ असलं तरी आजही आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने सगळ्यांचंच मन जिंकून घेतलं आहे.
तिच्या या फोटोवरून आपण अंदाज लावू शकतो की आजही ती तिच्या फिटनेसकडे किती बारकाईने लक्ष देते. हा फोटो शेअर करताना तिने लिहिलंय की, ‘ती फिट दिसण्यासाठी फिटनेस ट्रेनिंग घेत आहे. माझे शरीर, माझे नियम.’ गेली सात वर्षे सुष्मिता रुपेरी पडद्यापासून लांब आहे. १९ नोव्हेंबरला तिचा वाढदिवस आहे. काही दिवसांआधीच्या एका इव्हेंटमधले तिनं फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोमधली काळ्या रंगाचा ड्रेस घातलेल्या सुष्मिताने सगळ्यांनाच भुरळ पाडली. दरम्यान सुष्मिताने तिच्या मुलींसोबतचा फोटोही तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता.