skip to content
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्र१५ डिसेंबरपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याची पुन्हा घोषणा....

१५ डिसेंबरपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याची पुन्हा घोषणा….

मुंबई, सावर्जनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या १५ डिसेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत राज्य खड्डेमुक्त करू अशी घोषणा सावर्जनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली. राज्यामध्ये रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे सरकारला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने टीकेचा धनी झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता खड्डेमुक्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

राज्याला खड्डेमुक्त करण्यासाठी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात वॉररूम उभारण्यात आली असून याद्वारे राज्यभरात सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांचा लाईव्ह आढावा घेतला जाणार आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले. १५ डिसेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देत रस्त्यांचा दोष फक्त ठेकेदारांवरच नाही तर अधिकाऱ्यांवरही आहे.यासंदर्भात गेल्या तीन वर्षात वेगवेगळ्या कारणांमुळे २०० अधिकारी निलंबित केले असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

राज्यभरात सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाटील यांच्या कार्यालयात वॉररूम उभारण्यात आली आहे. या ठिकाणी राज्यातील सर्व ठिकाणच्या कामाचे लाईव्ह अपडेट घेतले जात असून काम सुरु असलेल्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी रोज थेट कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला जात आहे. या रूम मधून रोज दैनंदिन किती रस्ते झाले? कुठे काम सुरु आहे? याचा आढावा घेतला जाणार आहे. सोबतच चंद्रकात पाटील यांच्या ट्वीटरवरून झालेल्या कामाचे फोटो शेयर केले जात आहेत.

सध्याची रस्त्यांची नेमकी स्थिती काय?

यावेळी पाटील म्हणाले की, ३.५० लाख किमी रस्ते राज्यात आहेत यापैकी ९७ हजार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. ३ वर्षाआधी ५ हजार किमी राष्ट्रीय महामार्ग होते आम्ही प्रयत्न करून २२ हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग केला आहे. या २२ हजार किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १ लाख ६ हजार कोटी रुपये केंद्राकडून मिळणार आहेत. तूर्तास रस्त्याच्या कामासाठी अनेक अडचणी असल्याने आणि कायद्याने राष्ट्रीय महामार्गात शिफ्ट करण्याची समस्या असल्याने काम करू शकत नाहीत. मात्र  तरीही आम्ही  त्या रस्त्याच्या कामाला कामाची सुरुवात केली असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खड्डे किंवा रस्ते सुस्थितीत करण्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग करेल, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

सेल्फी टाकणाऱ्यांनी १५ वर्ष काय केले?

गेले काही दिवस अपुऱ्या माहितीच्या आधारे माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागावर टीका केली जात आहे असे सांगतानाच, खड्डेमुक्तीसाठी आधीचे सरकार निधी का नाही वाढवू शकले? असा सवाल करत त्यांनी बजेट फुगवून निकृष्ट दर्जाची कामी केली असा आरोपही त्यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर केला. जे टीका करत आहेत त्यांनी १५ वर्षात काय केले? रस्त्याची मूलभूत कामे का केली नाहीत? अशी विचारणाही पाटील यांनी केला. आज जे रस्त्यावर खड्डे आहेत त्याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी बेस पक्का केला नाही. १५ वर्षात जे करायचं होतं ते केलं नसल्याने ही स्थिती आल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments