बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. प्रिती झिंटाने ९०च्या “क्या कहाना” चित्रपटातनंतर प्रिती प्रकाशझोतात आली होती. प्रिती जेवढी तिच्या प्रोफेशनल लाईफला घेऊन चर्चेत राहिली तेवढीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन देखील राहिली. तिचे नेस वाडिशी असलेले अफेअरची बरीच चर्चा झाली. दोघे लवकरच लग्नच्या बेडीत अडकणार असल्याचे देखील समजले होते. पण नंतर त्या दोघांमध्ये असे काही घाडले की त्यांचे हे नाते संपुष्टात आले.
प्रीती एक अशी अभिनेत्री होती की जिची बॉलिवूडमध्ये सगळ्यांशी फार चांगले मैत्री होती. त्यात सलमान खानचे तिच्याशी नाते फार जवळचे होते. नेस प्रीतीच्या आधी अमिषा पटेलला डेट करत होता, त्याला अभिनेत्रींना डेट करायला आवडायचे पण त्याच्या गर्लफ्रेंडचे चित्रपटात काम करणे त्याला फारसे पसंत नव्हते. खरंतर झाले असे की सलमान खानची एक ऑडिओ टेप मीडियामध्ये लीक झाली ज्यामुळे प्रीती झिंटा आणि नेसचे नाते तुटले. या ऑडिओ टेपमध्ये सलमान खान प्रिती बरोबर आपले बेडरूम मधले संबंध असल्याचे ऐश्वर्या रायला सांगत होता. या दरम्यान प्रिती आणि नेस इटलीमध्ये सुट्टी एन्जॉय करत होते. जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनी ही टेप लीक करणाऱ्या संस्थेवर कोर्टात खटला दाखल केला पण हा खटला जास्त वेळ टिकू शकला नाही.
या गोष्टीवरूनंतर प्रिती आणि नेसमध्ये भरपूर वाद झाले, ही गोष्ट हाताबाहेर तेव्हा गेली जेव्हा नेसने प्रितीच्या चारित्र्य वर बोट ठेवले आणि ती पवित्र असल्याचा पुरावादेखील मागितला. प्रिती नेसला सोडून मुंबईमध्ये आपल्या घरी निघून आली आणि असे ह्या दोघांचे नाते संपत गेले. यानंतर प्रितीने जीन गुडेनगॉफशी लग्न केले. जीन हा फायनान्शिअल अॅनालिस्ट आहे. प्रिती आणि जीन एकमेकांना पाच वर्षे डेटवर होतो. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. बऱ्याच काळापासून प्रिती बॉलिवूड चित्रपटांपासून चार हात लांबच आहे.