गायिका नेहा कक्कर पती रोहनप्रीत सिंहसोबत लग्नानंतरची पहिली होळी साजरी करत आहे. नेहा होळी साजरी करण्यासाठी संपूर्ण कुटुंबीयांसोबत ऋषिकेश येथे पोहोचली आहे. नुकताच नेहाने सोशल मीडियावर होळी साजरी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळी साजरी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कुटुंबीयांसोबत स्विमिंग पूलमध्ये मजामस्ती करताना दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये नेहासोबत तिचा पती रोहनप्रीत सिंह, भाऊ टोनी कक्कर आणि इतर कुटुंबीय दिसत आहेत. ‘तेरा सूट’ हे गाणे देखील सुरु असल्याचे दिसत आहे.
बुधवारी नेहा रोहनप्रीतसोबत होळी साजरी करण्यासाठी ऋषिकेश गेली. तिकडे पोहोचल्यावर गुरुवारी रात्री नेहा पतीसोबत सासरी गेली. आता २८ मार्च रोजी नेहा पुन्हा ऋषिकेशला येणार आहे. २९ मार्चला ती गंगानगर येथील तिच्या घरी राहणार आहे.