जयपूर: दीपिका पदूकोनच नाक छाटू अशी धमकी करणी सेनेच्या पदाधिकाऱ्याने दिली. यामुळे पद्मावती विरुध्द अजुन वाद चिघळण्याची शक्यता आहे. करणी सेना पद्मावतीवरुन आक्रमक झाली आहे.
पद्मावती हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून सध्या या चित्रपटावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. पद्मावती चित्रपटातून राजपूत महिलांची बदनामी करण्यात आली असून ती बदनामी राजपुत समाज सहन करणार नाही असा वाद सध्या सुरु आहे. दररोज या चित्रपटाला विरोध होत असून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणखीणच वाद चिधळण्याची शक्यता आहे.