Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनअजिंक्य देव आणि मिलिंद गुणाजी झळकणार हॉलिवूड सिनेमात

अजिंक्य देव आणि मिलिंद गुणाजी झळकणार हॉलिवूड सिनेमात

एकीकडे बॉलिवूडमध्ये मनकर्णिका हा झाशीच्या राणीवर सिनेमा बनतोय. तर दुसरीकडे हॉलिवूडनंही झाशीच्या राणीमध्ये रस घेतलाय. स्वॉर्ड्स अँड सेप्टर्सअसं या सिनेमाचं नाव आहे आणि अजिंक्य देव आणि मिलिंद गुणाजी यांच्या सिनेमात भूमिका आहेत. मराठी कलाकारांना हॉलिवूडपटात संधी मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे.

स्वाती भिसे सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे, तर देविका भिसे झाशीच्या राणीची भूमिका साकारणार आहे. सिनेमात बरेच भारतीय कलाकार असतील. डेरेक जॅकोबी, नॅथानियल पारकर, रुपर्ट इवरेट या ब्रिटिश कलाकारांसोबतच नागेश भोसले, यतिन कार्येकर, मिलिंद गुणाजी, आरिफ झकारिया आणि अजिंक्य देव हे भारतीय कलाकार या चित्रपटात पाहायला मिळतील. विशेष म्हणजे अजिंक्य देव तात्या टोपेंची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments