Wednesday, September 11, 2024
Homeआरोग्यजाडेपणामुळे कमी होते मनुष्याची स्मरणशक्ती!

जाडेपणामुळे कमी होते मनुष्याची स्मरणशक्ती!

आतापर्यंत तुम्ही हेच वाचलं असेल की, जाडपणा म्हणजे आजारांचं घर. जनरली असं समजलं जातं की, जाड व्यक्तींमध्ये आजारांची शक्यता अधिक असते.

अनेक शोधांमधूनही समोर आलं आहे की, जाड लोकांमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधीत आजारांचा जास्त धोका असतो. पण आता नव्या शोधातून समोर आले आहे की, जाडपणामुळे केवळ माणूस आळशी होतो. इतकेच नाही तर त्याच्या स्मरणशक्तीमध्येही कमतरता येते. अभ्यासकांनी मिळवलेल्या माहितीनुसार, अल्जायमर या आजारासाठी जाडपणा सर्वात जास्त कारणीभूत आहे.

कॅंब्रिज युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर लूसी चेकनुसार, त्यांच्या टीमने नुकतेच ट्रेजर हंट नावाने एका स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यात वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना सहभागी करून घेण्यात आलं. त्यांना कॉम्प्युटर स्क्रिनवर वेगवेगळ्या जागांवर काही वस्तू लपवण्यास सांगण्यात आले. नंतर त्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. ज्या सहभागी लोकांचा बीएमआय(बॉडी मास इंडेक्स) जास्त होतं, त्यांची स्मरणशक्ती कमी होती.

अमेरिकेच्या एरिझोना युनिव्हर्सिटीच्या एका मनोवैज्ञानिकाने काही वर्षांआधी साधारण २० हजार लोकांची स्मरणशक्ती, बीएमआय आणि सी-रिअ‍ॅक्टिव प्रोटीनचे सॅम्पल घेतले होते. या शोधातून समोर आलं की, स्मरणशक्तीचा संबंध बॉडी मास इंडेक्सशी आहे. सोबतच इनफ्लेमेटरी प्रोटीन सुद्धा यासाठी जबाबदार आहे.

जाडपणासोबतच हाय ब्लड प्रेशर आणि इन्सुलिनची समस्या वाढते. यामुळेच खाण्याच्या सवयींमध्येही फरक पडतो. यानेही मेंदुवर प्रभाव पडतो. इन्सुलिन एक मुख्य न्यूरोट्रान्समीटर आहे. याचा परिणाम नवीन गोष्टी शिकणे आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवरही पडतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments