Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशजेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या कोकीलाबेन रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या जाण्याने बॉलिवूडकरांना धक्का बसला आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीत हॅपी गो लकी म्हणून ओळख असलेल्या शशी कपूर यांनी कपूर घराण्याचा कोणताही स्तोम माजवला नाही. सदैव जमिनीवर पाय असलेल्या या कलाकराने मल्टिस्टारर अनेक चित्रपटांमध्ये काम करताना आपला ठसा उमटवला. इंडस्ट्रिचा अनुभव आणि कपूर घराण्याची पार्श्वभूमी असूनही, त्यांनी अनेकदा दुय्यम भूमिका स्वीकारण्याचीही तयारी दर्शविली. जब जब फूल खिले, सत्यम शिवम सुंदरम् या चित्रपटांतील भूमिका विशेष लक्षात राहिल्या. सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांची जोडी कमालीची हिट ठरली. त्यांनी दिवार, त्रिशूल, कालापत्थर, हेराफेरी, शान, सुहाग, असे एकसे एक हिट सिनेमे इंडस्टिला दिले. वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे कपूर कुटुंबातील ते तिसरे सदस्य होते.

शशींचा जन्म १० मार्च १९३८ कोलकत्यामध्ये झाला होता. शशी कपूर यांना तिन आठवड्यांपूर्वी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शशी यांनी तब्बल १६० चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापैकी १४८ हिंदी तर इंग्रजी चित्रपट होते.

पुरस्कार 

२०११ मध्ये पद्म भूषण

२०१५ मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’

१९९४ मध्ये ‘मुहाफीज’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार

१९७९ मध्ये जुनून या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार

२०१० मध्ये फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार

शशी कपूर यांची गाजलेली गाणी

परदेसियोंसे ना अखिया मिलाना (जब जब फूल खिले १९६५)

एक था गुल और एक थी बुलबुल (जब जब फूल खिले १९६५)

दिन है बहार के (वक्त 1965)

नैन मिलाकर चैन चुराना (आमने सामने १९६७)

लिखे जो खत तुझे (कन्यादान १९६८)

नि सुलताना रे (प्यार का मौसम १९६९)

तुम बिन जाऊ कहा (प्यार का मौसम १९६९)

थोडा रुक जाएगी तो (पतंगा १९७१)

ओ मेरी शर्मिली (शर्मिली १९७१)

आज मदहोश हुआ जाए रे (शर्मिली १९७१)

वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ (आ गले लग जा १९७३)

तेरा मुझसे है पहले का नाता कोई (आ गले लग जा १९७३)

ले जाएंगे, ले जाएंगे.. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (चोर मचाये शोर १९७४)

कभी कभी मेरे दिल में (कभी कभी १९७६)

रात बाकी बात बाकी (नमक हलाल १९८२)

जवानी जानेमन हसीन दिलरुबा (नमक हलाल १९८२)

शशी कपूर यांचे गाजलेले चित्रपट

जब जब फूल खिले (१९६५)

हसीना मान जाएगी (१९६८)

शर्मिली (१९७१)

चोर मचाये शोर (१९७४)

दीवार (१९७५)

प्रेम कहानी (१९७५)

चोरी मेरा काम (१९७५)

कभी कभी (१९७६)

फकिरा (१९७६)

सत्यम शिवम सुंदरम (१९७८)

त्रिशूल (१९७८)

दुनिया मेरी जेब मे (१९७९)

काला पत्थर (१९७९)

सुहाग (१९७९)

शान (१९८०)

सिलसिला (१९८१)

नमक हलाल (१९८२)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments