skip to content
Saturday, May 18, 2024
Homeदेशकाँग्रेस अध्यक्षपदावर गांधी घराण्याचा वरचष्मा!

काँग्रेस अध्यक्षपदावर गांधी घराण्याचा वरचष्मा!

मुंबई – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील दोन प्रमुख राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांपैकी एक दीर्घ परंपरा लाभलेला व स्वातंत्र्य चळवळीतून वाढलेला पक्ष आहे. काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ मध्ये झाली. अॅलेन ऑक्टेव्हियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वॉ हे काँग्रेसचे संस्थापक आहेत. आता या पक्षाकडून नवीन अध्यक्ष निवडीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पक्षावर गांधी घराण्याचा वरचष्मा राहिला आहे.

काँग्रेसमध्ये ‘अध्यक्ष’ हा पक्षाचा प्रमुख असतो. आवश्यकता वाटल्यास उपाध्यक्षपदाची नेमणूक अध्यक्ष करू शकतो. अध्यक्षपदाची निवडणूक दरवर्षी होणे गरजेचे आहे. मात्र एकाच व्यक्तीने सलग किती वेळा अध्यक्ष व्हावे यावर बंधन नाही. पंडित नेहरू असेपर्यंतच्या काळात ते फार क्वचित अध्यक्ष होते मात्र श्रीमती इंदिरा गांधींनी पंतप्रधान व पक्षाध्यक्ष ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीने भूषवण्याची प्रथा सुरू केली जी पी.व्ही.नरसिंह राव यांच्यापर्यंत चालत आली. त्यानंतर श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद दुसर्‍या व्यक्तीकडे सोपवून पुन्हा सत्ताकेंद्रांची विभागणी केली.
आता काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून अध्यपदाच्या निवडीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  यासाठी गरज पडल्यास १६ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून निकाल १९ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल.

काँग्रेसवर गांधी घराण्याचा वरचष्मा – 
काँग्रेस पक्षात नेहरू-गांधी घराण्याने पक्षाची धुरा अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळात आहेत. मोतीलाल नेहरू, त्यांचे पुत्र पंडित जवाहरलाल नेहरू, नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी, त्यांचे पुत्र राजीव गांधी, यांच्यानंतर सोनिया गांधी असे वंशपरंपरेने काँग्रेसचे अध्यक्षपद चालत आले. सोनिया गांधी यांनी कलकत्ता येथे १९९७ साली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले, पण गांधी घराण्याचा एकूणच काँग्रेसवरील प्रभाव एवढा दांडगा होता की, १९९७ साली पक्षाच्या प्राथमिक सदस्या झालेल्या सोनिया गांधी पुढच्याच वर्षी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या आणि हे अध्यक्षपद गेली सुमारे एकोणावीस वर्षे त्यांच्याकडे आहे. आता राहुल गांधी त्यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष या दोन पदावर काही वर्षे काम केल्यानंतर २०१३ साली राहुल गांधी यांच्यावर काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

काँग्रेस अध्यक्ष १९४७ ते १९९०
या दरम्यानच्या काळात काँग्रेस पक्षात नऊ अध्यक्ष झाले यामध्ये पुरूषोत्तम दास टंडन, डी.के बोहरा, पट्टाभिसितारमय्या, नीलम संजीवा रेड्डी, एस. निजलिंगाप्पा, जगजीवन राम, शंकर दयाळ शर्मा, इंदिरा गांधी व राजीव गांधी
१९९० ते २०१० या वीस वर्षाच्या काळात पी.व्ही नरसिम्हाराव, सिताराम केसरी व सोनिया गांधी असे तीन पक्षाध्यक्ष काँगेसने पाहिले.

नेहरू-गांधी घराण्याचे नेतृत्व –
नेहरू-गांधी घराण्याकडून एकूण ४२ वर्षे काँग्रेसचे नेतृत्व केले. त्यामध्ये  मोतीलाल नेहरू : २ वर्षे,  जवाहरलाल नेहरू : ६ वर्षे, इंदिरा गांधी : ८ वर्षे, राजीव गांधी :७ वर्षे व सोनिया गांधी : १९ वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षपदी आहेत. मोतिलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होणारे गांधी- नेहरू घराण्यातील सहावी व्यक्ती असतील.
जवाहरलाल नेहरूंचे पक्ष नेतृत्व – १९२९-३०, १९३६-३७, १९५१-५४
इंदिरा गांधी – १९७८-१९८४
राजीव गांधी – १९८५-९१
पी.व्ही. नरसिंह राव -१९९२-९६
सीताराम केसरी – १९९६-९८
सोनिया गांधी- १९९८-२०१७

काँग्रेसमधील बंडखोरीची परंपरा –
राहुल गांधीपुढे बंडखोरीचे आव्हान – राहुल गांधी यांच्या काँग्रेसपक्षाध्यक्षपदी राज्याभिषेक होण्याच्या पार्श्वभूमीवर पक्षातंर्गतच नाराजीचा सूर उमटत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव व न्यूज चॅनलच्या डिबेटमध्ये नेहमी दिसणाऱ्या शहजाद पूनावाला यांनी याला ‘धोखा’ आणि ‘ढकोसला’  म्हटले आहे. पूनावाला यांनी राहुल यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पूनावाला यांनी निवडणूक प्रक्रियेवरही टीका केली आहे. शहजाद पूनावाला यांनी म्हटले आहे, की सर्वप्रथम राहुल गांधींनी काँग्रेस उपाध्यक्षपदाचा  राजीनामा दिला पाहिजे, जेणेकरून या पदाचा त्यांच्याकडून अनुचित लाभ उठवला जाऊ नये.

सोनिया  गांधी – जितेंद्र प्रसाद – सोनिया गांधी यांनी कलकत्ता येथे १९९७ साली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. त्यावेळी पक्षाची वाताहत झाली होती. पक्षसंघटन दुबळे झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा गांधी घराण्याच्या करिष्म्याची काँग्रेसी नेत्यांनी आवश्यकता भासू लागली. गांधी घराण्याचा एकूणच काँग्रेसवरील प्रभाव एवढा दांडगा होता की, १९९७ साली पक्षाच्या प्राथमिक सदस्या झालेल्या सोनिया गांधी पुढच्याच वर्षी काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून प्रमोट करण्यात आल्या.
जितेंद्र प्रसाद यांनी ९ नोव्हेंबर २००० रोजी झालेल्या पक्षाच्या अध्यक्षपदीच्या निवडणुकीत सोनिया गांधीच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यानंतर १६ जानेवारी २००१ रोजी त्यांचे दिल्लीत निधन झाले. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्षपद भूषविले होते.  तसेच ते माजी पंतप्रधान राजीव गांधी व पी.व्ही नरसिंह राव यांचे राजकीय सल्लागार म्हणूनही कार्य केले होते.

 लाल बहादुर शास्त्री – मोरारजी देसाई – एक काळ असा होता की, काँग्रेस पक्षात लोकशाही मूल्यांना सर्वाधिक महत्त्व होते, त्यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री यांना पंतप्रधानपदी नियुक्त करावे अशी चर्चा काँग्रेस पक्षात सुरू झाली, तेव्हा संसदीय काँग्रेस पक्षाच्या बैठकीत लालबहादूर शास्त्री यांच्या एकतर्फी निवडीस मोरारजी देसाई यांनी आव्हान दिले. आपण लालबहादूर शास्त्री यांच्या विरोधात निवडणूक लढवू इच्छितो अशी घोषणा मोरारजी भाईंनी केली.
अखेर संसदीय काँग्रेस पक्षाच्या नेतेपदासाठी म्हणजे त्यावेळी लोकसभेत काँग्रेसचे बहुमत असल्याने पंतप्रधानपदासाठी लालबहादूर शास्त्री आणि मोरारजी देसाई यांच्यात निवडणूक झाली. या निवडणुकीत शास्त्री यांनी मोरारजी भाईंचा पराभव केला आणि ते पंतप्रधान झाले.

इंदिरा गांधी – मोरारजी देसाई  – शास्त्रीजींच्या निधनानंतर नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी पुन्हा पूर्वीसारखीच प्रक्रिया पार पडली. त्यावेळीही काँग्रेसचे बहुतेक संसद सदस्य इंदिरा गांधी यांची निवड करावी या मताचे असताना मुरारजी देसाई यांनी पुन्हा इंदिरा गांधी यांना विरोध करून त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली. या निवडणुकीतही मुरारजी भाईंचा पराभव झाला.
इंदिरा गांधी जाणून होत्या की, मोरारजी देसाई त्यांच्यासाठी अडचणी वाढवत आहेत. त्यावेळी त्यांनी त्यांचे खच्चीकरण करण्यास सुरूवात केली. नोव्हेंबर १९६९ मध्ये जेव्हा काँग्रेसचे विभाजन काँग्रेस-आर आणि काँग्रेस-ओ मध्ये झाले. त्यावेळी मोरारजी देसाई इंदिरा गांधींच्या कांग्रेस-आय (इंडिकेट) मध्ये न जाता त्यांनी सिंडीकेट काँग्रेस-ओ मध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते १९७५ मध्ये जनता पक्षात गेले. मार्च १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. परंतु तेथेही पंतप्रधानपदासाठी दोन दावेदार उभे ठाकले. चौधरी चरण सिंह व जगजीवन राम. मात्र  जयप्रकाश नारायण यांनी जे कधी काळी काँग्रेसमध्ये होते त्यांनी आपले वजन मोरारजी देसाईंच्या पारड्यात टाकले व त्यांना पंतप्रधानपदी बसवले.
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी काळी काळ पक्षाध्यपद कामराज यांच्याकडे सोपविले होते. परंतु त्यांना यापूर्वी पक्ष कामकाजाचा व नेतृत्वाचा अनुभव असल्याने त्यांना दोन्ही अधिकारपदे आपल्याकडेच ठेवली.
इंदिरा गांधीच्या हत्येनंतर इच्छा नसतानाही राजकारणात आलेल्या राजीव गांधींना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अध्यक्षपद स्विकारण्याची गळ घातली. त्यामुळे त्यांना सर्वसमंतीने पक्षाध्यक्षपद बहाल करण्यात आले.
१९९१ मध्ये राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर पी.व्ही. नरसिंह राव यांनी पंतप्रधानपद व पक्षाध्यक्षपद दोन्ही आपल्याकडे ठेऊन पक्षाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवली. त्यांची पक्षावर मजबूत पकड होती. १९९६ मध्ये पक्षाध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर पक्षाची सूत्रे सीताराम केसरी यांच्याकडे गेली.

 शरद पवारांचे बंड – १९९६ मध्ये झालेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा बंडखोरी उफाळून आली व केसरींच्या विरोधात राजेश पायलट व शरद पवार यांनी निवडणूक लढवली. मात्र सदस्यांचा कल केसरींकडे असल्याने ते निवडून आले. तरीही पक्षाने पायलट यांना केंद्रात मंत्रिपद देऊन आपण नाराज असल्याचे दाखवले नाही. जून २००० मध्ये पायलट यांचा मृत्यू झाला.
केसरींनी सुमारे दशकभर काँग्रेसची सेवा केली. नरसिंह राव यांच्यानंतर सप्टेंबर १९९६ मध्ये केसरींना काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments