नवी मुंबई: सुषमा सुरेश गळवे हीला सासरच्या मंडळीने आत्महत्येस प्रवृत्त केले. असा आरोप मयत सुषमाचे वडिल सुरेश गवळे यांनी नेरुळ पोलिस ठाण्यात तक्रारीत केला. पोलिस आरोपींवर कारवाई करत नाही. आता तरी कारवाई करा. मुलीच्या आत्महत्येस जबाबदार लोकांना शिक्षा करा अशी मागणी मयत सुषमाच्या वडिलांनी केली.
सुषमा सुरेश गवळे (२१)रा.गायकर चाळ,शंकर बुवा वाडी, घनसोली नवी मुंबई असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे. सुषमा हीचे वडिल यांनी फिर्यादीत सांगितले की, सुषमा हिचे २२ फेब्रुवारी २०१५ रोजी निलेश उर्फ प्रकाश याचे सोबत लग्न झाले होते. निलेश हा नात्यातला असल्यामुळे त्याच्या सोबत लग्न लावून दिले होते. लग्नाच्या सहा महिण्यानंतर तीच्या सासरच्या मंडळींनी छळ सुरु केला होता. तु झोपडपट्टीतून आली आहे. तुमच्या घरच्यांची आमच्याशी बरोबरी करु नको,तुला एवढे महागडे कपडे कधी बघायला मिळाले हाते का? तुला एवढे महाग कपडे आमच्या घरात घालायला मिळाले. असे टोमणे तीला मारत होते. अशी तक्रार सुषमाने तिच्या वडिलांकडे केली होती. कुटुंबाकडून छळ सुरुच होता. एक दिवस सुषमा हिने कुटुंबियांना सांगितले मला असे बोलत जाऊ नका. त्याचवेळी तिला सासु,जाव,दिर,सासरे पतीने मारहाण केली होती. व जमीनवर पाडले होते.तसेच घराबाहेर काढून टाकले होते. २ ऑक्टोबर २०१७ रोजी संध्याकाळी मी माझे मालकास शिर्डी येथे घेऊन् गेलो असता तेथे सुषमा हिच्या सासुने माझ्या मोबाईलवर फोन करुन डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पीटल मध्ये येण्यास सांगितले. मी हॉस्पीटलध्ये आल्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितले की, सुषमा हिने राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र माझ्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. याप्रकरणी तीचा पती निलेश महादेव खिलारी, सासु सखुबाई खिलारी,सासरे महादेव खिलारी, दिर प्रशांत खिलारी,जाऊ कोमल खिलारी जबाबदार असल्याने त्याच्याविरोधात कायदेशी कारवाई करण्यात यावी.अशी तक्रार नेरुळ पोलिस ठाण्यात केलेली आहे. परंतु पोलिस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुरेश गवळे यांनी केला आहे.