Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeविदर्भनागपूरराज्याची आर्थिक श्वेत पत्रिका जाहिर करा - आमदार प्रकाश गजभिये

राज्याची आर्थिक श्वेत पत्रिका जाहिर करा – आमदार प्रकाश गजभिये

नागपूर : फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात जनतेला फसवून, निव्वळ  घोषणाबाजी, जाहिरातबाजी, फसवे आश्वासने देत सत्तेत आलेले भाजप शिवसेना  सरकार तिन वर्षाच्या काळात जनतेच्या विश्वासावर अपयशी ठरले आहे, याच्या
निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये  यांच्या नेतृत्वात संविधान चौकात  भाजपचा तिसरा दिवस, होम हवन व कळूघाटा  वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यंाना  निवेदनाव्दारे तीन वर्षात राज्य 4 लाख 25 हजार कोटी कर्जाच्या बोझात असून
राज्याची आर्थिक श्वेत पत्रिका जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली. भाजप शिवसेना सरकारने तिन वर्षाच्या काळात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने राज्यात केलेली विकासकामांचे भुमीपूजनच केले, कोणतीही नविन योजना न आणता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील
योजनांचे निव्वळ नावे बदलविण्यात स्वताची पाठ थोपून घेतली. राज्यातील जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅस, जिवनावश्यक वस्तू, भाजीपाला आदींच्या किंमती वाढवून ‘‘अच्छे दिन’’ च्या रूपात नविन भेट दिली आहे.
फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात भाजप शिवसेना सत्तेत आल्यापासून 3 वर्षाच्या काळात नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिठ, सावकारी कर्जबाजारी आदींमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात 13000 हजारांवर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यात भाग पाडणाऱ्या  भाजप शिवसेना सरकारने नविन विक्रम केला आहे, हे आहेत फडणविस, मोदी सरकारचे अच्छे दिन… देश स्वतंत्र झाल्यापासून औषध फवारी
विषबाध्यामुळे शेतकरी मरतोय, हे कधीही ऐकायला आले नाही पण राज्यात व केंद्रात भाजप शिवसेना सत्तेत आल्यापासून विदर्भात 35 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा शेतात औषध फवारणी विषबाध्यामुळे मृत्यू झाला. फवारणी औषध
कंपन्यांकडून कमीशन घेण्यासाठी विषारी औषध बाजारात आणण्यास परवाणगी देणाऱ्या भाजप शिवसेना सरकारवर 302 चा गुन्हा नोंदविला पाहिजे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments