Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रविधान परिषदेची आज निवडणूक, प्रसाद लाड की दिलीप माने?

विधान परिषदेची आज निवडणूक, प्रसाद लाड की दिलीप माने?

मुंबई : विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेसाठी आज गुरुवारी ७ डिसेंबर रोजी होणा-या पोटनिवडणुकीत भाजपा-शिवसेनेचे प्रसाद लाड आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिलीप माने असा सामना होणार आहे. पक्षीय संख्याबळाचा विचार करता लाड यांचे पारडे जड आहे. नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी होणा-या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.

भाजपाचे १२२, शिवसेनेचे ६३ आमदार आहेत. दोघांचे मिळून संख्याबळ १८५ होते. सात अपक्ष आमदार भाजपासोबत आहेत. युतीचे संख्याबळ १९२ होत असले, तरी लाड यांना २०० हून अधिक मते मिळावीत, यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. सेनेच्या एकाला मतदानाचा अधिकार नसल्याने त्यांचे संख्याबळ ६२ आहे. काँग्रसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१ मिळून ८३ आमदार आहेत. त्यात राष्ट्रवादीचे दोघे तुरुंगात आहेत. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ ८१ असेल.

या तिघांनी गमावला मतदानाचा अधिकार….
शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी उच्च न्यायालयाने रद्द ठरविली आहे. ते या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असले, तरी त्यांना उद्याच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसेल.छगन भुजबळ आणि रमेश कदम हे राष्ट्रवादीचे दोन आमदार सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे ते मतदानात भाग घेऊ शकणार नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments