Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रबाबासाहेबांच्या स्मारकाला महिनाभरात सुरुवात होईल- मुख्यमंत्री

बाबासाहेबांच्या स्मारकाला महिनाभरात सुरुवात होईल- मुख्यमंत्री

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला महिनाभरात सुरुवात होईल, टेंडर निघाले आहे, अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव , शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले. 

राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कात पोहोचले आहे. त्यामुळे संपूर्ण दादर परिसर भीमअनुयायांनी गजबजून गेला आहे. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी लाखो भीमसैनिक बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दाखल होतात. मात्र, यंदा ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाने शिवाजी पार्कात चिखल झाला आहे. तरीही भीमसैनिकांचा शिवाजी पार्ककडे येणारा ओघ सुरुच आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments