Thursday, September 12, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबाद‘अडीच हजार गॅस्ट्रो’ रुग्णांची छावणी!

‘अडीच हजार गॅस्ट्रो’ रुग्णांची छावणी!

महत्वाचे…
१.आठ दिवसापासून उलट्या, जुलाब सुरु होते नागरिकांना २.दूषीत पाणीपुरवठ्याने आजारी ३.सत्ताधारी,प्रशासनाचा कानाडोळा


औरंगाबाद: औरंगाबादच्या छावणी भागात गॅस्ट्रो या आजाराने अक्षरशः थैमान घातले आहे. आज तिसऱ्या दिवशी अडीच हजारापेक्षा जास्त रुग्णांचा आकडा गेला आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली असून छावणी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी याला गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला

छावणी भागात राहणाऱ्या शेकडो लोकांना मळमळ, उलटी, जुलाब याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे अनेकांनी उपचारांसाठी शासकीय रूग्णालय गाठले. लहान मुले, महिला, पुरूष, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांचाच यामध्ये समावेश आहे. रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेकांना जमिनीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागले. गॅस्ट्रोचे रूग्ण वाढल्याने छावणी परिसरातील सैन्य दलाच्या रूग्णालयातही काही रूग्णांना दाखल करण्यात आले आहे असेही डॉक्टरांनी सांगितले. छावणीच्या रुग्णालयात सुविधांचा वाणवा तर नेहमीच असून लाखो रुपये औषधींच्या नावावर खर्च केले जातात मग हा पैसा जातो कुठे असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला आहे.

बंद व्हॉल्वमधून पाणी पुरवठा केल्याने त्रास….

व्हॉल्वच्या दुरूस्तीमुळे छावणी परिसराला औरंगाबाद महापालिकेकडून पुरवले जाणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे सैन्य दलासाठी जे पाणी पुरवले जाते तेच पाणी येथील स्थानिकांनाही दिले जाते आहे. या पाण्यामुळेच गॅस्ट्रोची लागण एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे. पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचाही अहवाल प्राप्त झाला नाही.

हा तर नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार

छावणी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या जिवाशी काहीही देणे घेणे नाही. नागरिकांना मूलभुत सुविधा पुरवितांना दुर्लक्ष करण्यात आले. पाणी पुरवठा जर बंद पाईप लाईन मधून होत असेल तर ही गंभीर बाब आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. सर्व प्रकरण वरिष्ठ पातळीवर घेऊन जाऊ. अशी प्रतिक्रिया छावणी युवा विकास मंचचे सदस्य मयांक पांडे यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments