Sunday, May 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंची सभा ठाण्यातच होणार… मनसे

राज ठाकरेंची सभा ठाण्यातच होणार… मनसे

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाणे शहरातील रस्त्यावरील सभेला परवानगी देणार नाही अशी भूमिका ठाणे पोलिसांनी घेतली असतानाच आम्ही सभा घेणारच तीही ठाण्यातच!असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे सभेपूर्वीच ठाणे शहर व परिसरात वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.

अनधिकृत व परप्रांतीय फेरीवाला प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर येत्या १८ नोव्हेंबरला ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. मात्र या सभेच्या जागेवरुन वाद सुरु झाला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी विविधप्रकारे अडथळे आणले जात आहेत. इतर पक्षांच्या सभांना परवानगी मिळते तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच आडकाठी का असा सवाल मनसेचे नेते अमेय खोपकर आज पत्रकारांशी बोलताना केला.त्यांनी असेही सांगितले की,मनसेच्या आंदोलनामुळे कुणाचे हितसंबंध दुखावलेत,माफियांचे की भ्रष्ट यंत्रणेचे. एकीकडे सरकारविरोधी कुणी बोलले तर त्यावर सत्तेचा बडगा पडतोय. पण सरकारनेही हे समजून घ्यावे की ज्या लोकशाहीचे उठता बसता तुम्ही ‘संदर्भ’ देता त्याच लोकशाहीत भूमिका मांडणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होतो.  ही लोकशाही मुल्यांची पायमल्ली नाही का असा प्रश्नही त्यांनी केला.,आम्ही सभा घेणारच तीही ठाण्यातच,येत्या १८ नोव्हेंबर लाच घेणार असा इशाराही मनसेच्या वतीने नेते खोपकर यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments