सांगली: सांगली शहर पोलीस स्टेशनच्या आवारातून दोन आरोपींनी पलायन केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. (अनिकेत कोतळे) आणि (अमोल भंडारे) असे पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत.
या दोघांना दमदाटी करुन पैसे उकळण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तपासासाठी नेत असताना आरोपींनी पोलीस स्टेशनच्या आवारातून अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ते पसार झाले. सांगली पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.