Sunday, September 15, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिस उपनिरीक्षकाची बंदुकीची गोळी पायात घुसली!

पोलिस उपनिरीक्षकाची बंदुकीची गोळी पायात घुसली!

पंढरपूर : पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली. समोरच असलेल्या दुसऱ्या पोलिस उपनिरीक्षकाच्या पायात ती गोळी घुसली.

जखमी पोलिस उपनिरीक्षकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पंढरपुरात सध्या कार्तिकी यात्रेची धामधूम सुरु आहे. काही दिवसांवर कार्तिकी एकादशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे पंढरपुरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तावेळीच ही घटना घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments