Friday, June 21, 2024
Homeआरोग्यतीनशे दुखण्यांवर एकच उपाय

तीनशे दुखण्यांवर एकच उपाय

अत्यंत गुणकारी अशा एका वनस्पतीच्या वापराने तीनशेपेक्षा अधिक रोगांवर उपचार केले जाऊ शकतात. सगळीकडे सहजपणे सापडणाऱ्या या वनस्पतीच्या गुणांकडे मात्र फारसे लक्ष दिले गेले नाही. आयु्र्वेदाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असलेली ही वनस्पती म्हणजे शेवगा. शेवग्याची झाडे सर्वत्र आढळतात. शेवग्याचे मूळ, खोड, पाने, शेंगा, बिया आणि बियांचे तेल सर्व काही औषधोपयोगी आहे.

तोंड आल्यास शेवग्याची पाने चावून-चावून खावीत. तसेच शेवग्याची मुळे जंतनाशक असतात. शेवग्याच्या पानांच्या पावडरीचा उपयोग खरुज, उलटी होणे इ. वर होतो. तसेच जखमेवर पानांचा लगदा बांधल्यास आराम पडतो. कोवळ्या पानांच्या रसात मिरे घालून लेप लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. पानांच्या रसाने केसांतील कोंडा नाहीसा होतो.
शेवग्याचा पाला काहीसा तुरट असतो परंतु भाजी केल्यास उत्तम लागते. बरेच दिवसांच्या तापातून उठल्यास भूक पूर्ववत व्हावी म्हणून याची भाजी खावी. शेवग्याच्या पानाचे पोषणमूल्य अनन्यसाधारण आहे. यामध्ये दुधापेक्षा चौपट पटीने अधिक कॅल्शियम आढळते. सहा ते सात संत्र्यांमध्ये जितके जीवनसत्त्व ‘क’ आढळते तितकेच या पानांमध्ये आढळते. शेवग्याच्या पानातील प्रथिने पाचक असतात. तीन केळ्यांपासून जितके पोटॅशिअम आपल्याला मिळेल तितकेच एक वाटी भाजीत आपल्याला आढळते. याव्यतिरिक्त एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की एचआयव्ही, एड्‌ससारख्या रोगांवर रोगसंहारक व प्रतिबंधक म्हणूनही शेवग्याचा उपयोग केला जातो.

वरील बाबींशिवाय शेवग्याची फळं म्हणजेच बिया पिण्याचे पाणी शुद्ध करतात. बियांचा लगदा गढूळ पाण्याला निर्जंतुक करून स्वच्छ करतो. तसेच बियांचा उपयोग तेल काढण्यासाठी होतो. त्याला ‘ब्रेन ऑईल’ असे म्हणतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments