skip to content
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रसांगलीत एसटीवर दगडफेक

सांगलीत एसटीवर दगडफेक

महत्वाचे…
१.सांगलीमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून अनेक ठिकाणी पोलिसांची विशेष पथके तैनात २. काहीवेळासाठी डेपोतून एसटी बाहेर जाणे थांबवले ३. एस.टी वर दगडेफक ४. जिल्ह्यात तणाव
सांगली: सांगलीमध्येही अनिकेत कोथळेच्या हत्येच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश कामठेने केलेल्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत १२ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.


मुख्यमंत्र्यांनी कुणालाही विश्वासात न घेता सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव जाहीर केले. त्याचा निषेध करण्यासाठी सोलापूर बंदीची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, यशवंत सेनेने सोलापूरकरांना हा बंद हाणून पाडण्याचे आवाहन केले आहे. सोलापूर व सांगलीमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून अनेक ठिकाणी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, सांगली पोलिस दलातील प्रकार अतिशय अशोभनीय आहे. या प्रकरणात दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व सांगली पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या चौकशी मागणी होत असली तरी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कारवाईचा निर्णय घेण्यात येईल’, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

– सांगली- काहीवेळासाठी डेपोतून एसटी बाहेर जाणे थांबवले

– सांगलीत बंदला गालबोट, औरंगाबादहून सांगलीला येणाऱ्या एसटीवर दगडफेक

–  सांगलीत मृत अनिकेत कोथळेच्या घरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंतगराव कदम, विश्वजित कदम यांची भेट

– काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे बंद ठेवलाय.
– सांगलीत पोलिसांविरोधात ४० संघटनांनी बंद पुकारला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments