skip to content
Friday, May 24, 2024
Homeमनोरंजनमाधुरीमुळे जूहीनं 'हा' सिनेमा नाकारला

माधुरीमुळे जूहीनं ‘हा’ सिनेमा नाकारला

काही लोक वयाच्या चाळीशीतसुद्धा नटखट असतात. अशीच नटखट अभिनेत्री म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती जूही चावला. आज जूही चावलाचा ५० वा वाढदिवस आहे. वयाच्या पन्नाशीतही तिचा स्वभाव छान आहे.

जूही चावलाने आमिर खान आणि शाहरुख खान यांच्यासोबत अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण सलमान खानसोबत तिने जास्त काही काम केलं नाही. सुरुवातीला सलमान खान आणि जूही वेगवेगळ्या कार्यक्रमात भेटायचे, पण सलमान तिला लवकर ओळखायचाच नाही. तुम्ही कोण असंही सलमान खान जूहीला विचारायचा. त्याकाळी जूही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्यामुळे तिला न ओळखणं हे खूपच आश्चर्याचं होतं. जूहीचे असंख्य चाहते होते. पण ती मात्र श्रीदेवींची चाहती होती. एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं होतं की, ‘श्रीदेवी यांचा ‘चांदनी’, ‘लम्हे’ आणि ‘चालबाज’ हे सिनेमे मी खूप वेळा पाहिले आहेत.’

जूही आणि माधुरी यांच्यातील छुपी भांडणं बॉलिवूडमध्ये तेव्हा खूप प्रसिद्ध होती. ‘गुलाब गँग’ हा सिनेमानंतर जूहीने एका मुलाखतीत सांगितलं की, ” ‘दिल तो पागल है’ या सिनेमाची मला ऑफर आली होती पण फक्त माधुरीमुळे मी त्या सिनेमाला नकार दिला.” लग्नाबाबतीतचा जूहीचा विचार पक्का होता. ती बॉलिवूड क्षेत्रातल्या अभिनेत्याशी लग्न करणार नाही असं तिने ठरवलंच होतं. कारण तिला असं वाटायचं की सतत आरश्यासमोर उभं राहणाऱ्या मुलासोबत मी राहू शकणार नाही. जूही चावलाने तिच्या आगाऊ वृत्तीमुळे अश्या एका सिनेमाला नकार दिला की त्याने करिश्मा आणि गोविंदा सुपरहिट झाले. तो सिनेमा म्हणजे ‘राजा हिंदुस्तानी’.खरं तर ‘राजा हिंदुस्तानी’ हा सिनेमा आधी जूही चावलाला ऑफर करण्यात आला होता. पण तिने त्या सिनेमाला नकार दिला. आणि त्याचवेळेस करिश्माच्या सिनेसृष्टीतल्या प्रवासाला एक यशस्वी वळण लागलं. असो, जूहीची वृत्ती कशीही असली तरी तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. त्यामुळे आमच्याकडूनही जूहीला तिच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments