महत्वाचे…
१.गुजरात निवडणुकीच्या तोंडावर जीएसटीबाबत निर्णय २. पैशांचा पाऊस पाडूनही मतांची रोपटी उगवणार नाही ३. जीएसटीने गरीब जनता व लहान, मध्यम व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले
मुंबई : जीएसटीतील कर रचनेत करण्यात आलेल्या बदलानंतर आता शिवसेनेनं आपलं मुखपत्रा’तून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर तोंडसुख घेतलं आहे. याला भाजपा कशा प्रकारे उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
‘जीएसटीने गरीब जनता व लहान, मध्यम व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आणि हे बरोबर नाही. गुजरातेत लहान व्यापारी रस्त्यांवर उतरला. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसेल. पैशांचा पाऊस पाडूनही मतांची रोपटी उगवणार नाही या भयानेच जीएसटीप्रकरणी सरकार झुकले आहे.’ अशी थेट टीका शिवसेनेनं केली आहे.
गुजरात निवडणुकीच्या तोंडावर जीएसटीबाबत निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही शिवसेनेनं केला आहे. दरम्यान, शिवसेनेनं केलेल्या या टीकेला आता भाजप काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.