Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांनी मिलिंद एकबोटेंना पाठिशी घातलं होतं- प्रकाश आंबेडकर

शरद पवारांनी मिलिंद एकबोटेंना पाठिशी घातलं होतं- प्रकाश आंबेडकर

मुंबई : आघाडी सरकारच्या काळात सिमी आणि मिलिंद एकबोटेंच्या हिंदू एकता मोर्चावर बंदी घालण्यासंबंधीचा प्रस्ताव गृहविभागाने दिला होता. पण त्यावेळी शरद पवारांनीच एकबोटेंना पाठिशी घालण्याचं काम केलं, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

शरद पवार म्हणजे, मुहँ मे राम बगल मे छुरी असं काम करतात, ज्यावेळी कारवाईचा अधिकार असतो त्यावेळी ते काहीच करत नाही आणि नंतर फक्त बोलतात, त्यामुळे आपण पवारांच्या राष्ट्रवादीसोबत कदापिही युती करणार नाही, म्हणूनच मी संविधान रॅलीपासून लांब राहणंच पसंत केलं, असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकरांनी दिलं.

राजकारणात काही मुद्यांवर तडजोड होत नसते, या मताचा मी आहे. म्हणूनच मिलिंद एकबोटेंसारख्या लोकांना पाठिशी घालणाऱ्या लोकांसोबत मी कदापिही जाणार नाही, त्यामुळे शरद पवारांनी उगीच मला तोंड उघडायला लावू नये, त्यांना ते महागात पडेल. असा गर्भित इशाराच प्रकाश आंबेडकरांनी देऊन टाकलाय, आता आंबेडकरांच्या या गंभीर आरोपांवर राष्ट्रवादी नेमकी कशी रिअॅक्ट करते हे पाहावं लागेल.

कारण कोरेगाव भीमा प्रकरणानंतर महाराष्ट्रात शरद पवारांनी सर्वपक्षीय विरोधकांची मोट बांधून २६ जानेवारीला संविधान रॅली काढली होती. पण प्रकाश आंबेडकरांनी या रॅलीतील पवारांच्या पुढाकारामुळे त्यापासून लांब राहणंच पसंत केलं होतं तर दुसरीकडे हेच प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांचे ब्ल्यू आईड बॉय जितेंद्र आव्हाड या दोघांनी मिळून गुजरात इलेक्शननंतर शनिवारवाड्यावर सरकारविरोधात एल्गार परिषद घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण आता त्याच प्रकाश आंबेडकरांनी जितेंद्र आव्हाडांच्या नेत्यावर म्हणजेच शरद पवारांवर मिलिंद एकबोटेंना कधीकाळी पाठिशी घातल्याचा आरोप केलाय. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यावर नेमकं काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण याच मिलिंद एकबोटेंना कोरेगाव भीमा दंगलीत हिंसाचार घडवल्याप्रकरणी आरोपी करण्यात आलं असून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला. पण फडणवीस सरकारच्या पोलिसांकडून अद्यापही त्यांना अटक झालेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments