Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय निरुपम यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त

संजय निरुपम यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त

मुंबई – संजय निरुपम यांच्या अंधेरी लोखंडवाला येथील घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळच्या वेळेस मनसे कार्यकर्ते संजय निरुपम यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

निरुपम यांच्या निवासस्थानाबाहेर दोनशे ते तीनशे पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. निरुपम यांना भेटायला आलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी साडेदहाच्या सुमारास संजय निरुपम यांना भेटायला आलेल्या सहा ते सात कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले. माजी आमदार व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बलदेव घोसाई हे संजय निरुपम यांना भेटायला आले असता त्यांनाही प्रवेश नाकारला. निरुपम यांना भेटायला येणाऱ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पोलीस ताब्यात घेताना दिसत आहेत.
संजय निरुपम यांच्या निवासस्थानाबाहेर सध्या तणावाचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत. मनसेचे कार्यकर्ते संजय निरुपम यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्युत्तर देण्यासाठी निरुपम यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments