मुंबई – भारताची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचा दाखला जागतिक बँकेने काल दिला. त्याचे पडसाद आज शेअर बाजारात पाहायला मिळाले. निफ्टीने पहिल्यांदाच १०,४०० अंकांची विक्रमी नोंद केली. तर सेन्सेक्सने आणखी एक विक्रम नोंदविला. सेन्सेक्सने ३३,४५१ अंकांची विक्रमी पातळी गाठली.
जागतिक बँकेने जाहीर केलेल्या ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ यादीत भारताचा १०० वा क्रमांक आहे. मागच्यावेळी भारताचा क्रमांक १३० वा होता. जागतिक बँक रँकिंगमध्ये भारत ३० अंशांनी वर गेल्याने आज शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सप्टेंबर महिन्यामध्ये आठ प्रमुख क्षेत्रांचा विकासदर सहा महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर ५.२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी बळकटी दाखविली आहे.