मुंबई : राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
आरे इथं अनधिकृतरित्या वायकर यांनी व्यायामशाळा बांधल्याचा निरुपम यांनी आरोप एका पत्रकार परिषदेत केला होता. या पत्रकार परिषदेत आरेतील २० एकर जागा वायकर यांनी हडपल्याचा निरुपम यांनी आरोप केला होता. निरुपम यांच्या विरोधात हा दिवाणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्यांच्याविरोधात फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचं वायकर यांनी सांगितले. या प्रकरणासंदर्भात निरुपम यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती पण निर्णय वायकर यांच्या बाजूने लागला होता.