दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर एका वेगळ्याचं मागणीमुळे चर्चेत आहे. एका तरुणाने शशी थरूर यांना चक्क लग्नाची मागणी घातली आहे. आणि त्यांच्या या मागणीला शशी थरूर यांनी उत्तरही दिलंय.
दिल्लीत १२ नोव्हेंबरला एलजीबीटीक्युआई (लेसबियन, गे, बायसेक्सुअल, ट्रांसजेंडर, क्वीर आणि इंटरसेक्स) समुहाची रॅली निघाली होती. या रॅलीत या समुहाव्यतिरिक्त अन्य लोकंही सहभागी झाले होते. या रॅलीत एका गे मुलगा एक पोस्ट घेऊन उभा होता त्याचे सर्वांनीच लक्ष वेधलं होतं. त्या पोस्टरवर लिहिलं होतं ‘Shashi Tharoor, Marry Me’ म्हणजे “शशी थरूर माझ्यासोबत लग्न करा” त्याचा हा फोटो एका मासिकाने शेअर केला.
जेव्हा ही बाब शशी थरूर यांना कळाली तेव्हा त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. शशी थरूर म्हणतात, “हा-हा…जर हा तरुण तिरुवनंतपुरमचा असेल आणि मतदान करण्यासाठी पात्र असेल तर ते अधिक उत्तम राहिल”.
शशी थरूर यांच्या या प्रतिक्रियेचा सोशल मीडियाकर्मींना स्वागत केलं. अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिला. एका व्यक्तीने तर शशी थरूर हे देशाचे भावी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. तसंच आम्हाला सुशिक्षित राजकीय नेत्यांची गरज आहे. तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावा आम्ही नक्की मतदान करू असंही तो म्हणाला. तसंच एका तरुणाला शशी थरूर यांची प्रतिक्रिया खूप आवडली. आम्हाला राजकारणात अशा सकारात्मक लोकांची गरज आहे असंही तो म्हणाला.