Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेत गेलेले ६ नगरसेवकांपैकी ४ नगरसेवक मनसेत परतणार?

शिवसेनेत गेलेले ६ नगरसेवकांपैकी ४ नगरसेवक मनसेत परतणार?

मुंबई: मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांची घरवापसी होण्याची शक्यता आहे. कारण या चार नगरसेवकांनी  पुन्हा मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असा दावा मनसेने केला आहे.

या नगरसेवकांशी संपर्क झाला असून त्यांच्याशी चर्चा सुरु आहे, तसंच या नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे, असाही दावा मनसेकडून करण्यात आला आहे.

मनसेची साथ सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?

परमेश्वर कदम, हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव यांनी संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे. तसंच या नगरसेवकांनी दोन तासांनी निर्णय कळवणार असल्याचं सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी 13 ऑक्टोबरला मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक शिवसेनेते गेले होते.

भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं होतं.

या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मात्र याबाबत मनसेने कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती.

मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक :

@अर्चना भालेराव – वॉर्ड 126

@परमेश्वर कदम – वॉर्ड 133

@अश्विनी मतेकर- वॉर्ड 156

@दिलीप लांडे – वॉर्ड 163

@संजय तुर्डे – वॉर्ड 166

@हर्षल मोरे – वॉर्ड 189

@दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197

 वॉर्ड क्र. 166चे संजय तुर्डे सोडता सहाही नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत.

 

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227

  • शिवसेना अपक्षांसह – 84 +  4 अपक्ष = 88
  • भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 83+अपक्ष 2= 85
  • कॉंग्रेस – 30
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9
  • मनसे – 7
  • सपा – 6
  • एमआयएम – 2
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments