Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईउद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी थांबले अन् नारायण राणे आले!

उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी थांबले अन् नारायण राणे आले!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वाट पहाणाऱ्या शिवसेना आमदारांची आज चांगलीच धावपळ उडाली. विधानभवनाच्या गेटवर उद्धव ठाकरेंचे स्वागत करण्यासाठी थांबलेल्या शिवसेना आमदारांना शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांचे स्वागत करावे लागले. कारण ठाकरे आले समजून आमदार सज्ज झालेत पंरतु राणे आल्यामुळे नाईलाजास्तव त्यांच स्वागत करावं लागलं.

विधानभवनात आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ५ वाजता बैठक होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार म्हणून सगळे माध्यम प्रतिनिधी, कॅमेरामॅन, आणि सोबत शिवसेनेचे बहुतांश आमदार पायऱ्यांवर वाट बघत थांबले होते. त्यांच्यासोबत खास मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून भाजपचे आमदार प्रसाद लाडही पुष्पगुच्छ घेवून वाट पहात थांबले होते.

अर्धा-पाऊण तास वाट पाहिल्यावर एक मर्सिडीज गाडी गेटवर आली. माध्यमांचे प्रतिनिधीही गेटकडे धावले. त्यामुळे सगळे फोटोग्राफर तिकडे पळाले. सोबतच शिवसेनेचे आमदारही तिकडे धावतात. प्रसाद लाडही धावतच गेटकडे गेले. माध्यमांचे कॅमेरे फोटो घेण्यासाठी सज्ज झाले. तोच गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरले नुकतेच खासदार झालले माजी मुख्यमंत्री नारायण राणे. नारायण राणेंनाही कळेना नेमकं काय झालं ते. त्यातच फोटोग्राफर अन पत्रकार हसायला लागले. का हसताहेत असा प्रश्न राणेंना पडला. प्रसाद लाड यांनी हसतच राणेंचे स्वागत केले तर शिवसेना आमदारांचे चेहरे मात्र बघण्यासारखे झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments