Monday, May 13, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमुख्यमंत्री ‘चहा’ घोटाळ्यात!

मुख्यमंत्री ‘चहा’ घोटाळ्यात!

मंत्रालय हा घोटाळ्यांचा ‘अड्डा’ बनला असून सरकार ही दरोडेखोरांची टोळी बनली आहे. ‘भर अब्दुल्ला गुड थैली मे’ अशी परिस्थिती या सरकारची झालेली आहे. चहाच्या नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भांडवल करुन राजकीय डाव साधला. परंतु महाराष्ट्रात त्याच चहाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. उंदीर घोटाळ्याचा प्रकार ताजे असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील चहा घोटाळा समोर आल्यामुळे हे सरकार फक्त घोटाळे करण्यासाठी सत्तेत आले की काय असा प्रश्न उपस्थित होतो. पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्यांच्या प्रत्येक खात्यात ‘काळबेरं’ असून, दररोज नवनवीन घोटाळे उघडकीस येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात चहा-पाण्यावर होणाऱ्या खर्चामध्ये गेल्या २ वर्षांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. ग्रीन टी, लेमन टी, हर्बल टी अशा वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे प्रकार ऐकलेले आहेत. मुख्यमंत्री कदाचित नवीन प्रकारची सोन्याची चहा पित असतील किंवा पाजत असतील असच या आकडेवारीवरुन समोर आल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात चहा-पाण्यावर होणाऱ्या खर्चामध्ये गेल्या २ वर्षांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. २०१५-१६ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात ५८ लाख रुपये चहावर खर्च झाले. तर २०१७-१८ मध्ये हा खर्च वाढून ३.४ करोड इतका झाला. चहा-पाण्याच्या खर्चामध्ये ५७७% इतकी प्रचंड वाढ झाली. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात रोज १८,५०० कप चहा पिला जातो. एकीकडे रोज महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तर दुसरीकडे चहावर होणारा खर्च ५७७% इतका वाढवला जातो. चहाच्या,उंदीराच्या,चिक्कीच्या नावावर घोटाळे करुन मलिदा लाटणार हे सरकार भ्रष्टाचाराचा प्रतिक बनलं आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते स्वतः एकेकाळी चहा विकायचे असे मोठ्या अभिमानाने सांगतात. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा हा वारसा इतका पुढे घेऊन जातात की तो चहा सर्वसामान्य चहाच्या टपरीवर विकता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चहाच्या नावावर देश लुटायला बसलेले आहेत. गेल्याच आठवड्यात उंदीर मारण्याच्या आकडेवारी वरून विरोधकांसमोर सरकारचे नाक कापले गेले आणि आता हा नवीन घोटाळा समोर आला आहे. घोटाळा मग तो उंदीर घोटाळा असो किंवा चहा घोटाळा असो, यामध्ये सर्वसामान्य करदात्या नागरिकांची लूट होत आहे. सर्वसामान्यांचा पैसे लुटला जात आहे. घोटाळे करा आणि पन्नास पिढ्यांना पुरतील एवढा माल साठवून ठेवा अशी स्पर्धा सत्ताधाऱ्यांमध्ये लागली आहे. प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्लीनचीट देऊन मोकळे होत आहेत. राज्य कर्जबाजारी बनला आहे. सरकार घोष्णा जाहीर करुन प्रसिध्दी मिळवत आहेत. मात्र अंमलबजावणी करण्यासाठी पैसा नाही. अशा अवस्थेत आधी उंदीर घोटाळा झाला आता चहा घोटाळा समोर आला. यामुळे सरकार लुटारुंची टोळी असून घोटाळ्यांना आळा बसावा यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. पंरतु क्लीनचिट सरकार लुटालूटमध्ये लागलेली आहे. यांच पितळ उघड पडूनही त्यांचा सत्तेचा माज तसाच आहे. अशा भ्रष्ट लोकांपासून राज्याची,देशाशी सुरक्षा झाली पाहिजे. अन्यथा हे देशही विकून टाकतील अशी परिस्थिती सध्या झाली आहे.

वैदेही ताम्हण
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments