Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईउध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटलांमध्ये खलबतं

उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटलांमध्ये खलबतं

Uddhav Thackeray-Balasaheb Thorat-Jayant Patilमुंबई : शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये सत्तास्थापण्यावरून बैठकांचा जोर वाढला आहे. आघाडीची दुसरी बैठक आज हॉटेल हयात मध्ये पार पडली. यावेळी शिवसेना पक्षमुख उध्दव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये सव्वा तास चर्चा झाली. अशी चर्चा सुरु आहे.

तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्तास्थापन करणार आहेत. यासाठी आधी उध्दव ठाकरे आणि शरद पवार त्यानंतर उध्दव ठाकरे आणि अहेमद पटेल अशा बैठका झाल्या. त्यानंतर बुधवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आणि उध्दव ठाकरेंमध्ये बैठक झाली. काल रात्री काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठक झाली. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तास्थापण्यावरून हालचाली सुरु झाल्या आहेत.

बुधवारी इलेक्टॉनिक मीडियामध्ये दोन्ही काँग्रेसची बैठक रद्द झाली. वाद निर्माण झाला अशा बातम्या काही वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आल्या. त्यामुळे शरद पवारांच्या निवासास्थाना समोर जमलेल्या पत्रकारांना पवारांनी चांगलेच झापले. त्यानंतर सोशल मीडियावरही नागरिकांनी वृत्तवाहिण्यांवर तोंडसूख घेतले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments