Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमनोरंजनआता 'ठाकरे २'च्या स्क्रिप्टवर काम सुरू नवाजुद्दीन सिद्दीकी

आता ‘ठाकरे २’च्या स्क्रिप्टवर काम सुरू नवाजुद्दीन सिद्दीकी

Now work on the script of 'Thackeray 2' Nawazuddin Siddiqui
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे‘ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने वर्चस्व प्रस्थापित केलं. आता चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘ठाकरे २’ चे काम सुरू झाल्याची माहिती अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने केला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी सांगितले की, ‘ठाकरे २’ च्या स्क्रिप्टवर काम सुरू झालं आहे, स्क्रिप्ट लिहून पूर्ण झाल्यावर आम्ही चित्रीकरणाला सुरुवात करणार आहोत. पहिल्या भागात ठाकरेंची भूमिका मी साकारली असल्याने दुसऱ्या भागातही मीच त्या भूमिकेत दिसणार आहे असही सिद्दीकी यांनी सांगितल.

स्क्रिप्टचं काम पूर्ण झाल्यावर संजय राऊत मला सांगणार आहेत, त्यांचा निरोप आल्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात होईल. चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणं मला नेहमीच आव्हानात्मक वाटतं पण ही भूमिका साकारायला तितकाच आनंदही वाटतो. असेही नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments