Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईदिवाळीत एसटीच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांचे दिवाळे

दिवाळीत एसटीच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांचे दिवाळे

मुंबई: दिवाळीच्या सुट्यांमुळे खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट सुरु आहे. आता एसटी महामंडळानेही २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत एसटीची १० टक्के हंगामी दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे प्रवाशांचे चांगलेच दिवाळे निघणार आहे.

दिवाळीच्या सुट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे, खासगी बसेस, एसटीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तिकीटदरवाढ केल्यानंतरही नागरिकांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागतो. एस.टी. महामंडळाला गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या आताही १० टक्के भाडेवाढ केली आहे. २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू होणार असून, ही भाडेवाढ ५ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. ही भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) व शिवशाही (आसन) या बसेसला लागू राहील.

ही भाडेवाढ या गाड्यांना नाही…

शिवशाही (शयनयान)

शिवनेरी

अश्वमेध या बसेसला लागू होणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments