Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रगोहत्या करा, म्हणा-या भाजपचे मंत्री रावसाहेब दानवेंना अटक करा : राष्ट्रवादी काँग्रेस

गोहत्या करा, म्हणा-या भाजपचे मंत्री रावसाहेब दानवेंना अटक करा : राष्ट्रवादी काँग्रेस

Raosaheb Danve
गोहत्या बंदी असतांना सुध्दा मतांसाठी खूशाल गोहत्या करा. मी आहे, असे जाहीरपणे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे.

केंदीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचा गायी कापा म्हणून एका बैठीत लोकांना सल्ला देत आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडिवर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा प्रकार म्हणजे कायदा तोडण्याचा सल्ला आणि प्रोत्साहन देवून लोकांच्या भावनेशी खेळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि अटक करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये लक्ष घालून जे अशाप्रकारचे मंत्री आहेत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी देखील मलिक यांनी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments