Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम

aaditya-thackeray,Shiv Sena,Thackerayमुंबई: शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं पाठिंब्याच पत्र मिळालं नाही. शिवसेनेकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तीन दिवसाची मुदतवाढ मागण्यात आली होती. मात्र, राज्यपालांनी नकार दिला अशी माहिती युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र शिवसेना सत्तास्थापन करण्याचं दावा करु शकली नाही. त्यामुळे सत्तास्थापण्याचा पेच कायम आहे. राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. कारण शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरीही पाठिंब्याचं पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलं नाही त्यामुळे राज्यपालांनी यासाठीची वेळ वाढवून दिली नाही. त्यामुळे दावा जरी कायम असला तरीही शिवसेनेला दिलेली मुदत संपली आहे. शिवसेना दिलेल्या वेळेपर्यंत बहुमत सिद्ध करु शकलेली नाही. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments