Placeholder canvas
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेनेची पुढची दिशा उद्या मातोश्रीवर ठरणार

शिवसेनेची पुढची दिशा उद्या मातोश्रीवर ठरणार

uddhav thackeray shivsena cm seatमुंबई : सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची महत्त्वाची बैठक शनिवारी दुपारी मातोश्री निवासस्थानी होत आहे. या बैठकीत शिवसेनेची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक झाले आहेत. ते सर्व आमदारांचा कल शनिवारी जाणून घेणार असून त्यानंतरच सेनेची पुढची दिशा ठरणार आहे. महाराष्ट्राने पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीला सत्तेसाठी कौल दिला असला तरी यावेळी दोन्ही पक्षांचं संख्याबळ पाहिल्यास शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे.
भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या असून बहुमताचा १४५ हा आकडा लक्षात घेता शिवसेनेच्या इशा-यावरच भाजपला चालावं लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपला लोकसभा निवडणुकीवेळी ठरलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याची आठवण करून दिली. आपल्यात जे ठरलंय त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आता आली आहे. जागावाटपात समजून घेतलं पण सत्तावाटपात मी समजून घेणार नाही, असा शिवसेना स्टाइल सूर उद्धव यांनी या पत्रकार परिषदेत लावला होता. त्यानंतर शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदारही आता या मागणीवर जोर देऊ लागले आहेत. त्यामुळे शनिवारी शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments