Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeकोंकणपालघरपालघरला भूकंपाचे धक्क्यामागून धक्के !

पालघरला भूकंपाचे धक्क्यामागून धक्के !

The earthquake hit Palghar
पालघर : पालघरला भूकंपाचे धक्के सुरुच असून, पालघर जिल्हा आज पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे 4 वाजून 6 मिनिटांनी पालघरमध्ये डहाणू, कासा, तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के बसले. काही ठिकाणी सौम्य स्वरुपाचे धक्के बसले. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे.

दीड वर्षांपासून पालघरमध्ये सतत भूकंपाचे धक्के बसत आहे. शनिवारी पहाटे 4 वाजून 6 मिनिटांनी कासा ,चारोटी, पेठ,शिसने, आंबोली परिसरात भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का सौम्य स्वरुपाचा असला तरी नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान शुक्रवारी 2.6, 2.0, 2.0, 2.4, 1.8, 1.9 रिस्टर स्केल क्षमतेचे 5 धक्के पालघरमध्ये बसल्याची नोंद करण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, कासा, तलासरी तालुक्यात भूकंपाचे सातत्याने धक्के बसत असतात. शुक्रवारी दिवसा आणि रात्री पालघरमध्ये जवळपास 5 सौम्य स्वरुपाचे धक्के जाणवले. तर शनिवारी पहाटेच्या सुमारात 2 धक्के बसल्याची नोंद गुजरात सिसमोलोस्टिक रिसर्च सेंटरने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments