Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशरद पवारांची सोमवारी सोनिया गांधींसोबत बैठक

शरद पवारांची सोमवारी सोनिया गांधींसोबत बैठक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींसोबत पवारांची बैठक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सेना भाजपच्या गोंधळावरून रणनिती आखण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागून अकरा दिवस उलटे आहेत. सेना भाजपामध्ये सत्तेच्या वाटपावरून संघर्ष पेटला आहे. शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिला नाही तर काँग्रेस महाआघाडीने काय निर्णय घ्यायचा याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे संसदीय नेते खासदार संजय राऊत यांनी 175 आमदारांचा समर्थन असल्याचा दावा केला. शरद पवारांची भेटही घेतली त्यामुळे काँग्रेस महाआघाडी शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा सुरु आहे. यामुळे सोमवारी दिल्लीत काय होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments