Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशभाजपचे नवे नाव ‘भारतीय जासूसी पार्टी’ : काँग्रेस

भाजपचे नवे नाव ‘भारतीय जासूसी पार्टी’ : काँग्रेस

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपवरील हेरगिरी प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. भाजपचे नवे नाव ‘भारतीय जासूसी पार्टी’ आहे. असा हल्लाबोल काँग्रेसचे  प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा देखील व्हॉट्सअ‍ॅपकडून स्पायवेअरशी निगडीत एक मेसेज आलेला आहे. जे फोन हॅक करण्यात आले, त्यावर व्हॉट्सअ‍ॅपकडून पाठवण्यात आलेला मेसेज प्रियंका गांधी यांना देखील आला आहे. ‘अबकी बार जासूसी सरकार’ आणि भाजपचे नवे नाव ‘भारतीय जासूसी पार्टी’ असं आता जनता बोलत असल्याचं सुरजेवाला यांनी म्हटले आहे. तसेच, याबाबत मोदी सरकारने सखोल चौकशी व कठोर कारवाई करायला हवी, अशी देखील पत्रकारपरिषदेद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी सुरजेवाला म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे देखील फोन हॅक करण्यात आले आहेत. सरकार विरोधकांवर अशाप्रकारे लक्ष ठेऊन आहे की त्यांना राजकीय माहिती मिळवायची आहे. हा एक अपराध आहे. तसेच, त्यांनी भाजपा सरकार व त्यांच्या एजन्सीजकडून इस्रायलच्या ‘एनएसओ’ च्या एका सॉफ्टवेअरचा वापर करून राजकीय नेते, संपादक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार इत्यादींचे फोन हॅक करण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments