Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रपरवानगी नाकारली तरीही सोमवारचा मोर्चा निघणारच- प्रकाश आंबेडकर

परवानगी नाकारली तरीही सोमवारचा मोर्चा निघणारच- प्रकाश आंबेडकर

मुंबई: आमच्या एल्गार मोर्चाला परवानगी मिळो अगर न मिळो मोर्चा निघणारच असा रोखठोक इशारा भारिपचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. संभाजी भिडेंना जाणूनबुजून अटक केली जात नाही असाही आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषदेत रोखठोक भूमिका मांडली.

सरकार सैतानाला पाठिशी घालते आहे आणि सावाला शिक्षा करते आहे. ही भूमिका आम्हाला अजिबात मान्य नाही. त्यामुळे या सैतानाला पकडा असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. संभाजी भिडे यांच्या अटक झाली नसल्याने हा लोकशाहीचा गळा दाबत असल्याचीही टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. ज्यांनी मारले ते सनातनी हिंदू आहेत. सरकार त्यांना पकडत नाही.ज्यांनी मार खाल्ला त्यांच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न होतो आहे हे दुर्दैवी आहे असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मोर्चात काही गोंधळ झाला तर त्याची जबाबदारी सरकारची….

त्यामुळे मुंबईत उद्या पुन्हा एकदा सरकार विरोधातला एल्गार रस्त्यावर दिसून येणार आहे हे नक्की झाले आहे. मोर्चात काही गोंधळ झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल, सरकारने मारेकऱ्यांना मोकळे सोडले आहे तर मार खालेल्ल्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आम्ही हे कदापी सहन करणार नाही असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचार संभाजी भिडे गुरूजींमुळे उसळल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याप्रकरणी जबाबदार असलेले संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी त्यांनी केली होती. एकबोटे यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून अजून भिडे गुरूजींना अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भिडे गुरूजींच्या अटकेची मागणी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments