Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeदेशफारुख शेख यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलची आदरांजली

फारुख शेख यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलची आदरांजली

Farouque Shaikh

आपल्या अभिनयाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच नजाकत आणली असं अनेकांचच मत. मुख्य म्हणजे चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल थेट गुगलनेही घेतली आहे. फारुख शेख यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने गुगलने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी म्हणून एक सुरेख असं डूडल साकारलं आहे.

‘उमराव जान’, ‘साथ साथ’ या चित्रपटातील भूमिकांमुळे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकणाऱ्या या अभिनेत्याचा प्रवास फारच रंजक होता. चला तर मग नजर टाकूया चित्रपट आणि मालिका विश्वामध्ये नावाजलेल्या अशा फारुख शेख यांच्याविषयीच्या जाणून घेऊ या.

अमरोली येथे जन्मलेले फारुख शेख हे पाच भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांनी वकिलीचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. किंबहुना या क्षेत्रात त्यांनी कामही केलं. पण, तरीही त्यांना मात्र वेगळ्याच वाटा खुणावत होत्या. अखेर त्यांनी या क्षेत्रातून काढता पाय घेत अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला.

पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी मानधनाची कोणतीच अट ठेवली नव्हती. १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गर्म हवा’ या चित्रपटासाठी रमेश सथ्यू अशाच एका कलाकाराच्या शोधात होते. या चित्रपटासाठी त्यांना ७५० रुपये इतकं मानधन मिळालं होतं. पण, तेही चित्रपट साकारल्याच्या पाच वर्षांनंतर. भूमिका लहान असो वा मोठी. आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक पात्राला मोठ्या ताकदीनं सादर करण्याला ते प्राधान्य द्यायचे. रेखा यांची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या ‘उमराव जान’ या चित्रपटातही लहान भूमिका साकारण्यास त्यांनी कोणतीच हरकत दर्शवली नव्हती. किंबहुना हीच भूमिका त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण देऊन गेली. फारुख शेख यांनी नेहमीच चित्रपटाच्या संख्येपेक्षा त्यांच्या कथानकांवर आणि दर्जावर जास्त भर दिल्याचं पाहायला मिळालं. चित्रपट निवडीविषयी बरीच काळजी घेणाऱ्या या अभिनेत्याने आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत जवळपास ४० चित्रपटांमध्ये काम केलं. फक्त चित्रपट विश्वच नव्हे, तर मालिका जगतातही त्यांची लोकप्रियता पाहायला मिळाली. ‘चमत्कार’, ‘जी मंत्री जी’ या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments