Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईरावसाहेब दानवेंचा पुत्र जिंकला, जावई हरले!

रावसाहेब दानवेंचा पुत्र जिंकला, जावई हरले!

Santosh Danve,Raosaheb danve, Danve,मुंबई : भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे हे जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदारसंघातून विजयी झाले. मात्र, दानवेंचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून पराभूत झाले.
मराठा आरक्षणासाठी हर्षवर्धन जाधव यांनी आमदरकीचा राजीनामा दिला होता. हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभेत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते. त्याची परत फेड म्हणून एमआयएमने कन्नडमध्ये हर्षवर्धन जाधव यांना पाठिबाही दिला होता. पंरतु, कन्नडच्या मतदारांनी हर्षवर्धन जाधवांचा पराभव केला. येथे शिवसेनेचे उदयसिंह राजपूत हे निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे मतदानाच्या दोन दिवस आधी हर्षवर्धन जाधवांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर जाहीर सभेत टीका केली होती. त्यानंत हर्षवर्धन जाधवांच्या बंगल्यावर दगडफेक झाली होती. व वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे सदस्य अंबादास दानवे यांनी टीका खपवून घेणार नाही,असा इशारा दिला होता. हर्षवर्धन जाधवचा पराभव करु असा विडा उचलला होता. अखेर त्याचाही फटका हर्षवर्धन जाधव यांना बसला. याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments