Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईप्रकाश आंबेडकर ‘या’ कारणांसाठी उध्दव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर

प्रकाश आंबेडकर ‘या’ कारणांसाठी उध्दव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर

Prakash Ambedkar meet Uddhav Thackeray, Prakash Ambedkar, uddhav thackeray, caa, nrc, matoshreeमुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा ( CAA ), राष्ट्रीय नागरिक नोंदणी ( NRC) या विषया संदर्भात दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह एल्गार परिषदेतील सामाजिक कार्यकर्त्यांना शहरी नक्षलीचा आरोप करत अटक करण्यात आली आहे, त्यांच्या सुटकेच्या दृष्टीनेही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आज मंगळवारी प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेणार आहे. यामुळे याभेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर हे नागरिकत्व सुधारणा कायदा ( CAA ), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधात दादरमध्ये आंदोलन करणार आहेत. त्याबाबत त्यांनी व्हिडिओव्दारे  सर्वांना या आंदोलनात सहभाग होण्यासाठी आवाहन केले आहे. त्या आंदोलनाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 1 जानेवारीला भीमा कोरेगाव इथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमादरम्यान, करावयाच्या नियोजनबाबतही प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात भीमा कोरेगाव इथला कार्यक्रम चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जाते. त्याचा आढावा घेण्याबाबत दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments