Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

Dilip Walse Patil NCP Protem Speakerमुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. बहुमत सिद्ध करण्यासाठी सरकारने तयारी केली आहे. दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बहुमत चाचणी शनिवारी होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नव्या सरकारला ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत आहे. अर्थात फार वेळ न दवडता ताबडतोब विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा नव्या सरकारचा मानस आहे. शनिवारी बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे सत्र होणार आहे. यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीकडे पूर्ण बहुमत असून विश्वासदर्शक ठराव जिंकू असं आधीच आघाडीने जाहीर केलं होतं. त्यामुळे ठाकरे सरकारला कोणताही टेंशन होणार नाही.

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. २००९ ते २०१४ या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती. आता त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असली तरी विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्यास वळसे-पाटील यांचेच नाव अध्यक्षपदासाठी अग्रणी असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उद्धव यांनी काल, गुरुवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथील सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचं मंत्रालयात जोरदार स्वागत झालं. आता सर्वांच्या नजरा उद्याच्या ठरावाकडे लागल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments