Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

Uddhav Thackeray to become CM, swearing at Shivaji Park tomorrowमुंबई : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्विकारण्याआधी उद्धव ठाकरेंनी हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. मंत्रालय शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी,पदाधिका-यांची मोठ्या प्रमामात गर्दी होती.

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मंत्रालयाबाहेर समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आज पदभार स्वीकारला त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments