मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आपल्याकडे महत्त्वाची माहिती असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्यांनी अनेक गंभीर आरोपही केले होते. त्यामुळे पवार यांना ४ एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना सनन्स बजावण्यात आले आहेत. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसा उसळली होती. या प्रकरणी स्थापण करण्यात आलेल्या भीमा कोरेगाव आयोगासमोर साक्ष नोंदवण्यात येणार आहेत. ४ एप्रिलला ही साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यासाठी शरद पवारांना आयोगाच साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आलं आहे.
Bhima Koregaon Commission has summoned Nationalist Congress Party Chief Sharad Pawar to appear before the Commission on 4th April.
The Commission is inquiring into the reasons which led to the 2018 Bhima Koregaon violence in Maharashtra. (File pic) pic.twitter.com/tLJqmHjUBs
— ANI (@ANI) March 18, 2020
पवारांनी चौकशी आयोगासमोर स्वतः केले होते प्रतिज्ञापत्र सादर…
शरद पवार यांनी यापूर्वी चौकशी आयोगासमोर स्वतः एक प्रतिज्ञापत्रही सादर केलं आहे. त्यानंतर त्यांना साक्षीसाठी बोलवावं अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे आता चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी या माहितीचा तपासात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत न्यायालयालाही माहिती दिली आहे. आयोगाचं चौकशीचं वेळापत्रक ठरलं असून शरद पवार यांना साक्षीसाठी बोलावण्यात आलं आहे.