Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेश'मी गांधीवादी, माझ्याकडे ‘बॉम्ब किंवा पिस्तूल’ही नाही!

‘मी गांधीवादी, माझ्याकडे ‘बॉम्ब किंवा पिस्तूल’ही नाही!

बंडखोर आमदारांना भेटण्यापासून दिग्विजयसिहांना रोखले

नवी दिल्‍ली : मध्यप्रदेशचा सत्तापेच कायम आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी बंगळुरुला गेले होते मात्र, रमाडा हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांना भेटण्यापासून पोलिसांनी दिग्विजयसिहांना रोखले. ‘मी गांधीवादी असून माझ्याकडे बॉम्ब नाही किंवा पिस्तूलही नाही. मला काँग्रेस आमदारांना भेटू द्या. मी परत निघून जाईन,’ असं दिग्विजय सिंह यांनी यावेळी सांगितलं.

दिग्विजय सिंह यांना पोलिसांकडून गेटवरच अडवण्यात आलं. त्यावरून आक्रमक झालेले दिग्विजय सिंह आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलसमोरच ठिय्या आंदोलन केलं. नंतर पोलिसांनी दिग्विजय सिंह आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अटक केली आहे. सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी दिग्विजय सिंह यांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी दिग्विजय सिंह यांच्या सोबत कर्नाटक काँग्रेस प्रमुख डी शिवकुमार होते.

दुसरीकडे, मध्‍य प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून कमलनाथ सरकारला आव्हान दिलं आहे. फ्लोअर टेस्‍ट लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर सुनवाणी घेत सुप्रीम कोर्टाने मध्‍य प्रदेशातील कमलनाथ सरकार, विधानसभाध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाला नोटिस बजावली आहे. याबाबत उत्तर मागितले आहे. याप्रकरणी बुधवारी (१८ मार्च) सुनावणी होणार आहे.

हॉटेल बाहेरच मांडला ठिय्या…

बंगळुरु येथे मीडियाशी संवाद साधताना दिग्विजय सिंह यांनी सांगितलं की, ‘मी मध्य प्रदेश राज्यसभेचा उमेदवार आहे. येत्या २६ मार्च रोजी मतदान होणार आहे. माझे २२ समर्थक आमदार येथे थांबले आहेत. त्यांना सगळ्यांना माझ्याशी बोलायचं आहे. काँग्रेस आमदारांचे फोन हिसकावण्यात आले. पोलिस त्यांना भेटू देत नाही आहेत. त्यानंतर दिग्विजय सिंह यांनी हॉटेलबाहेर ठिय्या मांडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments