Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईनारायण राणेंच्या भाजपा पक्षप्रवेशाला पुन्हा हुलकावणी?

नारायण राणेंच्या भाजपा पक्षप्रवेशाला पुन्हा हुलकावणी?

Narayan Rane, BJP, Shiv Senaमुंबई : स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार नारायण राणे सहकुटुंब भाजपात प्रवेश करणार आहेत. आज राणेंचा भाजपा प्रवेश होणार होता परतुं, आजचा प्रवेशसोहळा पुन्हा लांबणीवर गेला आहे. शिवसेनेकडून राणेंच्या प्रवेशाला कडाडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे युतीचा ताळमेळ बसला नाही त्यामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.

राणे हे भाजपात अधिकृत प्रवेश आहेत. त्यासाठी कोकणातले त्यांचे कार्यकर्ते मुंबईतही दाखल झाले होते. त्यांचा मेळावा आयोजीत केला होता परंतु तो रद्द करण्यात करण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे. राणे यांनी मागच्या आठवड्यात सांगितले होते की, शिवसेना भाजपा युतीचं काहीही असो माझं भाजप प्रवेश नक्की होणार आहे. असे सांगितले होते.

शिवसेनेकडून राणेंच्या भाजपा प्रवेशाला जोरदार विरोध होत असल्यामुळे राणेंचं प्रवेश लांबणीवर पडत असल्याची माहिती समोर येत आहे. राणेंचा भाजपामध्य प्रवेश झाला व त्यांच्या मुलांना विधानसभेची उमेदवारी मिळाली तर त्याविरोधात शिवसेना काम करेल अशीही भीती भाजपाला आहे. हा वाद सुटत नसल्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश सोहळ्याला तारीख पे ताऱीख वाट बघावी लागत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments