Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईरेल्वेच्या मेगाब्लॉकने प्रवाशांचे बेहाल

रेल्वेच्या मेगाब्लॉकने प्रवाशांचे बेहाल

मुंबई : लोकल हि मुंबईकरांची लाईफन आहे. रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड बेहाल होत आहेत. रेल्वे रुळ दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येतो. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावपर्यंत धीम्या मार्गावर ब्लॉक चालणार आहे. यामुळे रविवारी सुट्टीचा दिवस असूनही बाहेर पडतांना बसेस,टॅक्सी,रिक्षा,खासगी वाहनांचा सहारा घेऊन प्रवास करावा लागत आहे

तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक… 

मध्य रेल्वेवर सकाळी १०.३७ ते दुपारी ४.०२ पर्यंत मुलुंड ते माटुंगा दरम्यान सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीपर्यंत दोन्ही मार्गांवर स. ११.१० ते दु. ४.१० पर्यंत ब्लॉक चालेल. पश्चिम रेल्वेवर स. १०.३५ ते दु. ३.३५ पर्यंत बोरीवली ते गोरेगावपर्यंत अप आणि डाऊन मार्गांवर ब्लॉक चालणार आहे. या ब्लॉक कालावधीत या मार्गावरील सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत. तसंच राम मंदिर स्थानकावरही लोकल थांबणार नाही. या मेगाब्लॉकमुळे लोकल सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे.

धीम्या मार्गावर ब्लॉक

मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर रविवार, २२ एप्रिलला सकाळी ११ ते दु. ४.१०पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावपर्यंत धीम्या मार्गावर ब्लॉक चालणार आहे.

मध्य रेल्वेवर कल्याणहून निघणाऱ्या सर्व धीम्या लोकल स. १०.३७ ते दु. ४.०२ पर्यंत मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकांवर थांबा असून, त्यानंतर त्या पुन्हा माटुंग्यापर्यंत धीम्या मार्गावर चालतील. सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद आणि सेमीफास्ट लोकल स. १०.१६ ते दु. २.५४ पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील. कल्याणहून सुटणाऱ्या जलद आणि सेमीफास्ट लोकल स. १०.०४ ते दु. ३.०६ पर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांत थांबतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या लोकल स. ११ ते सायं. ६ पर्यंत किमान १० मिनिटे उशिराने धावतील. लोकल प्रमाणेच मेल/एक्स्प्रेस गाड्यादेखील किमान १५ मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्गावरही ब्लॉक

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीपर्यंत दोन्ही मार्गांवर स. ११.१० ते. दु. ४.१०पर्यंत ब्लॉक चालेल. सीएसएमटीहून पनवेल-बेलापूर-वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल स. १०.३४ ते दु. ३.३९ आणि पनवेल-बेलापूर-वाशीहून सीएसएमटीच्या दिशेने सुटणाऱ्या लोकल स. १०.२१ ते दु. ३.४१ पर्यंत खंडीत राहतील. प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलपर्यंत विशेष फेऱ्या चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वेवर स. १०.३५ ते दु. ३.३५पर्यंत बोरिवली ते गोरेगावपर्यंत अप आणि डाऊन मार्गांवर ब्लॉक चालणार आहे. या कालावधीत सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर चालतील. ब्लॉक कालावधीत बोरिवलीतील १,२,३,४ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लोकल थांबणार वा सुटणार नाहीत. राममंदिर स्थानकातही लोकल थांबणार नसून, काही फेऱ्या रद्द होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments