Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशभाजपचा केंद्रीय मंत्री बरळला, भारतात बलात्काराच्या एक दोन घटना होणारच!

भाजपचा केंद्रीय मंत्री बरळला, भारतात बलात्काराच्या एक दोन घटना होणारच!

Santosh Gangwar, Union Ministerनवी दिल्ली : महिला आणि मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी देश हादरून निघत असताना भाजपच्या आणखी एका नेत्यानी वादग्रस्त विधान केले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी महिला अत्याचारासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. एवढ्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक दोन घटना होणारच, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री गंगवार यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री गंगवार म्हणाले की, बलात्काराच्या घटना दुर्दैवीच आहेत, मात्र प्रत्येक वेळी अशा घटना थांबविणे शक्य नाही. केंद्र सरकार सक्रिय असून कारवाई करत आहे. एवढ्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक दोन घटना घडल्या तर त्याला फार मोठा प्रश्न बनवायला नको, असे वादग्रस्त वक्तव्य गंगवार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments